ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

विरोधकांची आता सुपारी पण ठेवावे लागेल – देवेंद्र फडणवीस

नागपूर: राज्याचं हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूर इथं होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला हवं. विरोधकांना विदर्भ मराठवाड्यासाशी काहीही देणं घेणं नाही हे त्यांच्या भूमिकेवरून दिसतं, असं फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षांच्या दुपारच्या पत्रकार परिषदेत काही नेते झोपले होते, जसे ते तीन राज्यात झोपले, अशी कोपरखळी फडणवीसांनी लगावली.
आमच्या चहापानावर बहिष्कार घातला. चहापान हे चर्चेकरता होत असतं. पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावे लागेल म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते.
आज विरोधी पक्षाने न येण्याची कारणे आणि जे पत्र दिलेला आहे, मगाशी मी बघितलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते. म्हणजे तीन राज्यात जसे झोपले तसे. पत्रकार परिषदेतील काही लोक झोपी गेले होते पण तशाच झोपेत हे पत्र लिहिले आहे का असा प्रश्न पडावा अशा प्रकारचे पत्र विरोधी पक्षाने दिलं आहे.

error: Content is protected !!