[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

जय श्रीराम- म्हणणाऱ्या शाळकरी मुलांना शिक्षा -भायखळ्यातील कॉनवेंट शाळेचा अजब न्याय

मुंबई – लहान मुले हि देवा घरची फुले असतात . त्यांना जात धर्म या गोष्टी ठाऊक नसतात. आणि विद्येच्या मंदिरात शिक्षण घेणाऱ्या या मुलांना त्यांच्या शिक्षकांनी किंवा शाळा प्रशासनाने जात धर्मा पासून वेगळे ठेवायला हवे. असे  असताना भायखळ्याच्या -पूर्व एका इंग्रजी शाळेत मुलांनी फळ्यावर केवळ जय श्रीराम लिहले म्हणून शाळेने एक दिवस त्यांना शाळेत बसू दिले नाही. हा प्रकार अन्यायकारक आहे. कारण अशा प्रकरणातून मुलांना अभ्यासाऐवजी जात -धर्म या सारख्या अनावश्यक गोष्टींचे धडे मिळतात. जे बाळ मनावर परिणाम करतात. कारण मुलेही ओल्या मातीच्या भांड्या सारखी असतात. त्यांना बाल वयात जसा आकार दिला जातो तशी ती घडतात. जो हिंदू आहे त्याच्या घरात रामाचे नेहमी नाव घेतले जाते किंवा दोन हिंदू माणसे समोरासमोर आल्यावर एकमेकांना रामराम करतात . त्यामुळे मुलांच्याही तोंडात राम नाम असू शकते . अर्थात ते त्यांनी फळ्यावर लिहिले होते. पण ती लहान मुले असल्याने फळ्यावर जय श्री राम लिहण्या मागे त्यांचा काय हेतू असणार . पण अशा निष्पाप मुलांना शिक्षा ठोठावणे चुकीचे आहे. त्यातून शाळे सारख्या पवित्र ठिकाणी जातीयवादाला खतपाणी घातले जाऊ शकते. या घटनेची शिक्षण विभागाने योग्य दखल घेऊन संबंधित शाळेची चौकशी करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत.
        दखल- पालक आणि  समाजसेवक यानी या घटनेची दखल घेत लवकरच  संबंधित शाळा आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारनार आहेत.

error: Content is protected !!