[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ढोल ताशांच्या गजरात गणेश भक्तांचा बाप्पांना निरोपपुण्यात ४ तर शहापूर मध्ये ५ गणेशभक्त बुडाले


मुंबई/काल चतुर्थीच्या दिवशी अकरा दिवसांच्या गणरायांचे ढोल ताशांच्या गजरात विविध चौपाट्यांवर तसेच तसेच छोट्या गणपतींचे विविध कृत्रिम तलावांवर विसर्जन करण्यात आले. गणेश भक्तांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.मोठ्या गणपतींचा विसर्जन सोहळा पहाटेपर्यंत सुरू होता लालबागच्या राजाचे आज सकाळी गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले . दरम्यान पुण्यात मनाच्या कसबा गणपतीसह सर्व गणपतींचे भक्तिभावाने ढोल ताशांच्या गजरात विसर्जन करण्यात आले.मात्र पुण्यात ४ तर शापूरमध्ये ५ गणेशभक्त बुडाल्याने विसर्जन सोहळ्याला काहीसे गालबोट लागले.
विसर्जनासाठी शनिवारी मुंबई प्रचंड असा पोलीस बंदोबस्त होता गिरगाव दादर आ आदी मुंबईतील प्रमुख चौपाटीवर तसेच रस्त्याच्या दुतर्फा तुफान गर्दी लोटली होती मुंबईच्या रस्त्यांवरून विसर्जनाच्या मिरवणूक सुरू असल्याने वाहतुकीसाठीचे अनेक मार्ग बदलण्यात आले होते जवळपास ३६००० पोलीस आणि अन्य सुरक्षा दले तसेच बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथके तैनात होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलीस डोळ्यात तेल घालून विसर्जनाच्या मिरवणुकांवर तसेच चौपाटीवर नजर ठेवून होते मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि मानाचा गणपती समजला जाणाऱ्या लालबागच्या राजाचे सकाळी साडेअकरा वाजता गणेश मंडपातून प्रस्थान झाले आणि जवळपास वीस तासानंतर विसर्जन करण्यात आले यावेळी विसर्जन सोहळ्यात गणेश फक्त मोठ्या संख्येने सामील झालेले होते. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष सुरू होता मुंबईतल्या सर्व चौपाट्या फुलून गेल्या होत्या मुंबई जवळपास साडेसहा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचे विविध चौपाटीवर विसर्जन करण्यात आले तर दीड लाखाच्या आसपास घरगुती गणेशांचे विविध कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले मुंबई सह ठाणे नवी मुंबई पालघर तसेच महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्येही मोठ्या भक्ती भावाने विसर्जन सोहळा पार पडला शहापूर मध्ये ५ तरुण बुडाल्याचे वृत्त आहे.तर पुण्यातही चौघे बुडाल्याचे समजते. यंदाचा विसर्जन सोहळा अत्यंत शांततेत आणि कडेकोट बंदोबस्तात कोणताही अनुचित प्रकार न घडता भक्ती भवाने पार पडला

error: Content is protected !!