ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

आरोग्य केंद्र बंद करून मंदिरे उघडायची का? मुख्यमंत्री

मुंबई/ जे राजकीय पक्ष सातत्याने मंदिरे उघडण्याची मागणी करीत आहेत त्यांना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या साक्षीनेच चांगलेच झापले ते म्हणाले की आरोग्य केंद्र ही सुधा मंदिरच आहेत मग ही आरोग्य केंद्र बंद करून मंदिरे उघडायची का असा थेट सवाल त्यांनी विरोधकांना केला.
पूर्व पश्चिम डोंबिवलीला जोडणाऱ्या कोपर पुलाचे काल मुख्यमंत्र्यांनी ऑन लाईन उद्घाटन केले यावेळी बोलताना ते म्हणाले की कोरोंनाचा तिसऱ्या लाटेचा धोका आहे अशावेळी सरकार सावधपणे पावले टाकीत आहे टप्पया टप्प्याने सगळ्या गोष्टी खुल्या केल्या जात आहेत त्यामुळे मंदिरे खुली करण्याच्या मागणीवर राजकारण करू नका सध्या कोरोणाशी लढणारे डॉकटर हे सुधा देवासारखे आहेत आणि रुग्णालये मंदिरे आहेत अशावेळी आरोग्याची ही मंदिरे बंद करायची आणि मंदिरे सुरू करायची का असा सवाल त्यांनी केला या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री कपिल पाटील एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे आदी मान्यवर हजार होते

error: Content is protected !!