ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

ध्वनिप्रदूषण


मशिदींवरील भोंग्यांच मुद्दा सामाजिक की राजकीय हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे पण या मुळे ध्वनी प्रदूषणाचां मुद्दा ऐरणीवर आलाय.आणि सरकारवर या मुद्द्यांबाबत धोरण ठरवण्याची वेळ आली आहे.राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्याना विरोध तर केला पण त्यांचा हा विरोध कधीतरी बुंमरेंग होईल असे कुणालाही वाटले नव्हते कारण आता सगळ्याच धार्मिक स्थळांवर लावलेले भोंगे हटवण्याची पाळी आली आहे.त्याच बरोबर ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी पोलिसांचे एक पथक सुधा तयार करण्यात आले आहे आणि सरकारचा हा निर्णय शंभर टक्के बरोबर आहे कारण कारण मशिदींवरील भोंग्यांवर दिल्या जाणाऱ्या अजाण चां तर त्रास होतंच होता . पण हिंदूंच्या काही मंदिरांवर लावलेले भोंगे आणि त्याद्वारे मोठ्या आवाजात होणाऱ्या आरत्या आणि भजन कीर्तन याचाही लोकांना त्रास होत होता शिवाय लग्न कार्य आणि सणांच्या निमित्ताने लावले जाणारे लाऊड स्पीकर मिरवणुकीत डिजे लावून मोठमोठ्या आवाजात घातला जाणार धांगड धिंगाना याला आता कुठे तरी आला बसणार आहे.या देशात दिवसभर काम धंदा करून घरी आलेल्या माणसाला दोन घटका शांतपणे आराम करायचा असतो पण लाऊड स्पीकर वरची अंजान आणि मंदिरातील आरत्या आणि भजनाचे मोठे आवाज यामुळे शांततेने जगू पाहणाऱ्या सर्व सामान्य माणसांचे जिने हराम झाले होते आता सरकारने या ध्वनिप्रदूषणाला काही प्रमाणात का होईना पायबंद घालून लोकांना दिलासा दिल्याबद्दल सरकारचे आणि या मुद्द्याला वाचा फोडणाऱ्या राज ठाकरेंचे अभिनंदन करायलाच हवे.आता नाशिक बाजा, कच्ची बाजा, डिजे,यासारख्या कर्णकर्कश वाद्यांवर बंदी घालावी कारण लग्नकार्य,धार्मिक विधी,आणि निवडणुकीतील विजयी मिरवणुका यामध्ये नशिकबाजा, डि जे ,यासारखी कर्णकर्कश वाद्दे वाजवून जे ध्वनी प्रदूषण केले जाते ते सुधा थांबायला हवे कारण लोकांना शांतता हवी आहे.कारण अगोदरच महागाई,बेरोजगारी,आरोग्य शिक्षण यासारख्या अनेक प्रश्नांनी लोकांचं डोकं खराब झालेलं आहे लोकांचा ताण तणाव वाढत आहे अशावेळी कर्णकर्कश वादे वाजवून लोकांच्या क्षिनलेल्या मेंदूला आणखी त्रास देणे बरोबर नाही याचा सरकारने आणि समाजानेही विचार करायला हवा

देवाला शांतता हवी असते मग तो अल्ला असो की येशू असो की हिंदूंचे 33 कोटी देव असोत प्रत्येक देवाला शांतता हवी असते.असे असताना देवाच्या दरबारात हे कर्णकर्कश ध्वनी प्रदुषण का ? माणसांना नाही पण निदान देवाला तरी शांततेने रहुद्या कशासाठी मोठ्या आवाजात अजाण आणि आरत्या व भजने.देव कुठल्याही धर्माचा असो देवाच्या दरबारात गेलेल्या माणसाला थोडावेळ आत्मिक शांती मिळते .देवाच्या दरबारात दोन घटका शांतपणे बसून परमेश्वराचे चिंतन केल्यावर माणसाला एक आत्मिक बळ मिळते.ही वस्तुस्थिती ठाऊक असताना लाऊड स्पीकर आणि इतर वाद्यांचा गोंगाट कशासाठी? गणेशोत्सव,नवरात्रोत्सव यासारख्या उत्सवांमध्ये जरूर लाऊड स्पीकर लावावा पण त्याच्या आवाजावर मर्यादा असायला हवी विनाकारण मोठा आवाज करून दर्शनाला येणाऱ्या आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास कशासाठी ? आणि म्हणूनच सरकारने ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या आहेत त्याचे प्रत्येकाने पालन करायला हव

error: Content is protected !!