केंद्राकडून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे अमित शहांचे आश्वासन
नाशिक/ अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानी बाबत राज्य सरकारने अहवाल पाठवावा केंद्र सरकार तातडीने मदत देईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आश्वासन दिले
गेल्या महिन्यात मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसानं झोडपून काढलं. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. काही शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलं. शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिलं. आज गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी लोणीमधील शेतकरी मेळाव्यात अमित शहा उपस्थित होते.अमित शहांनी उपस्थितांना संबोधित केलं. राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानी संदर्भात बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, ‘राज्य सरकारने अहवाल पाठवला तर, केंद्र सरकार नुकसानभरपाई देईल’, असं ते म्हणाले.
महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीसदृश पाऊस पाहायला मिळाला. या अतिवृष्टीमुळे विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत होते. जोरदार पावसामुळे नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते, तर घाट क्षेत्रांमध्ये भूस्खलन होण्याच्या घटना घडतात. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. उभ्या पिकांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन, कापूस, मका आणि फळबागांचे मोठे नुकसान होते. ज्यामुळे अनेक ठिकाणी ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. आता याच पार्श्वभूमीवर सरकारकडून तातडीने मदत दिली जावी, अशी मागणी केली जात आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबद्दल मोकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या शिर्डी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. अमित शाह यांनी भाषणादरम्यान महाराष्ट्रातील अतिवृष्टीबद्दलही भाष्य केले. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एकाप्रकारे इंद्रदेवाने यंदा संकट पाठवले आहे. ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमीन आणि शेतीचे नुकसान झाले. २४-२५ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून ३१३२ कोटी रुपये आम्ही महाराष्ट्र सरकारला दिले आहे. त्यातील १६३१ कोटी रुपये होते ते एप्रिल महिन्यातच पंतप्रधान मोदींनी दिले आहे, असे केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले.ठी घोषणा केली आहे
महाराष्ट्र सरकारने असे अनेक निर्णय घेतले आहेत, जेणेकरुन शेतकऱ्यांना मदत होईल. २२१५ कोटी रिलीफ फंड दिला. ज्यातून ३१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल. १० हजार रुपये रोख आणि ३५ किलो धान्यही महाराष्ट्र सरकारकडून दिले जात आहे. तसेच कर्जमाफीच्या वसूलीही रोखण्यास सांगितले आहे. ही महाराष्ट्रातील जी त्रिमूर्ति आहेत यातील कोणीही व्यापारी नाही. पण हे तिघेही व्यापारीपेक्षा जास्त आहेत. मला पद्मश्री पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी बोलवलं आणि विचारले की भारत सरकार महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय करेल, कालच त्या तिघांनी माझ्यासोबत चर्चा केली आहे, असेही अमित शाहांनी म्हटले. अमित शहा यांच्या आश्वासांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या महिनाभराच्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ६० लाख हेक्टर पेक्षा अधिक जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे घरेदारे कोसळली.गुरे वाहून गेली .या अतिवृष्टीत मनुष्यहानी सुधा झाली असे असताना नुकसानी बाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात इतका उशीर का झाला? असा सवाल शरद पवार यांनी फडणवीस सरकारला केला आहे.तसेच लवकरात लवकर प्रस्ताव पाठवण्याची मागणी केली आहे.
