ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

लखिंमपुर खिरी हत्याकांडाच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद


मुंबई/ कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कार खाली चिरडून मारल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी महाविकास आघाडीतील पक्षांनी ११ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे . या बंद मध्ये शिवसेना ताकतीने उतरणार असल्याने बंद १०० टक्के यशस्वी होईल असे बंद समर्थकांचे म्हणणं आहे .
लखिमपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने कार घातली यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता तर त्या नंतर झालेल्या हिंसाचारात ४ जन मारले गेले होते या घटनेनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना लखिमपूर मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले प्रियांका गांधी यांना अटक करण्यात आली तर इतर नेत्यांचीही अडवणूक करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ ११ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात बंद पुकरण्यात आलाय .

error: Content is protected !!