ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पाकिस्तान वर भारताचा डिजिटल स्ट्राइक पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यासह पाकिस्तानचे अभिनेते आले क्रिकेटपटूंचे युट्युब चॅनेल अकाउंट बंद


नवी दिल्ली/पहेलगाव मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने हळूहळू पाकिस्तानच्या मुसक्या आवळायला सुरुवात केल्या आहेत. सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर, आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाद शरीफ यांच्यासह, पाकिस्तानातील अभिनेते, अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंचेही युट्युब चॅनेल आणि इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानवर भारताचा हा सर्वात मोठा डिजिटल स्ट्राइक आहे.
पंतप्रधानांसह ,पाकिस्तानचे पाकिस्तानी पंतप्रधान,त्यांचे मंत्री तसेच काही अभिनेते, अभिनेत्री, आणि क्रिकेटपटूही भारताविरुद्ध गरळ ओकत होते .यामध्ये पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी याचा समावेश होता. त्यामुळे आता भारताने या सर्वांचे यूट्यूब चैनल आणि इंस्टाग्राम अकाउंट बंद केले आहे. परिणामी आता हे लोक भारताविरुद्ध गरळ ओकू शकणार नाही. भारत येत्या काही तासात पाकिस्तानवर हल्ला करणार याची प्रचिती आल्यामुळेच, तिथल्या सेलिब्रिटींकडून भारताविरुद्ध अपप्रचार सुरू होता. दरम्यान आता पाकिस्तानने दहशतवाद्यांना आपला पाठिंबा होता हे जाहीरपणे कबूल केले आहे. खुद्द संरक्षण मंत्री ख्वाजा अहमद आणि बिलावल भूतो यांनी तशी जाहीरपणे कबुली ही दिली आहे .त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत.

error: Content is protected !!