[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

कर्नाटकची पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडली

नागपूर – महाराष्ट तोडून इथली गावे कर्नाटकला जोडण्याचे स्वप्न कर्नाटकचे मुख्यमंत्री पाहत आहेत . त्यांनी जत मधील ४० गावांवर तसेच सोलापूर आणि अक्कलकोट मधील कांही भागांवर हक्क सांगितल्याने महाराष्ट्रातील जनता संतापली आहे असे असताना कर्नाटकातील पर्यटन स्थळांची माहिती देणारी पोस्टर्स नागपुरात लावण्यात आली होती . ती सर्व पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडून टाकली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. मात्र, नागूपर विमान स्थळावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येण्यापूर्वी कर्नाटकमधील पर्यटन स्थळांची माहिती देणारे बॅनर झळकले होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही गावे कर्नाटकात येण्याची हालचाल सुरु झाल्याचे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात वादंग सुरु असतानाच नागपूर विमानतळावर ‘चला कर्नाटक पाहू’ असे बॅनर लावण्यात आले होते. यावर मुख्यमंत्री बोम्मई आणि कर्नाटकचे पर्यटन मंत्री आनंदी सिंह यांचे फोटो होते .

error: Content is protected !!