[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

डी वार्डातील 2 लाचखोर अधिकाऱ्यांना अटक

मुंबई / पालिकेतील लाचखोरीचे प्रमाण वाढत चालले असून 1लाख 90 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी पालिकेच्या डी वॉर्डातील इमारत व कारखाना विभागाच्या 2 अभियंत्यांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लाऊन रंगेहाथ अटक केली
ऑटो मोबाईल स्वेअर पार्ट दुकान चालवणाऱ्या एका दुकानदाराला सोसायटीच्या सामायिक जागेत मागच्या बाजूला कायमस्वरूपी शेड बांधायची होती त्यासाठी
पालिकेतील डी विभागाच्या इमारत व बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता चंद्रकांत जलील आणि दुय्यम अभियंता दत्तात्रय मने यांनी 2 लाखांची लाच मागितली होती पुढे 1लाख 90 हजारांवर तडजोड झाली ‘मात्र त्या दुकानदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करताच त्यांनी सापळा लाऊन या दोन्ही अभियंत्यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक केली .

error: Content is protected !!