ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

चार राज्यांच्या विधासभां निवडणुकीत भाजपची बंपर जीत – काँग्रेसला केवळ तेलंगणात यश


भोपाळ/ गेल्या महिन्यात झालेल्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले भाजपने मध्य प्रदेशातील आपली सत्ता कायम राखली पण राजस्थान आणि छतीसगड ही काँग्रेसकडे असलेली राज्य सुधा हिसकावून घेतली तर तेलंगणात सत्ता धारी बी आर एसचा धुव्वा उडवून काँग्रेसने तेलंगणा वर झेंडा फडकवला
राजस्थानातील 199 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 115 जागा जिंकल्या तर काँग्रेसला केवळ 70 जागा मिळाल्या छतीसगड्ड मधील 90 जागांपैकी 54 जागा भाजपने जिंकल्या तर काँग्रेसला केवळ 36 जागाच मिळाल्या.मध्य प्रदेशच्या 230 जागांपैकी भाजपने 163 जागा जिंकल्या तर काँग्रेसला 66 जागांवर समाधान मानावे लागले .तेलंगणातील 119 जागांपैकी काँग्रेसने 64 जागा जिंकल्या बी आर एस पक्षाला 39 जागा मिळाल्या तर एम आय एमने 8 व भाजपला 8 जागांवर यश मिळाले

error: Content is protected !!