[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

पक्ष बांधणीच्या आड येणाऱ्याला तुडवा – राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

लांजा – सध्या कोकण दौऱ्यावर असलेले राज ठाकरे हे आता चांगलेच आक्रमक झाले असून काल लांजा येथे पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्ष बांधणीवर भर द्या जर कोण आडवा आला तर त्याला तुडवा . मी मुंबई वरून वकिलांची फौज पाठवीन असे आदेश दिले आहेत .
: मुंबईच्या नेस्को मैदानावर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अॅक्टिव मोडवर आल्याचं पहायला मिळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय.

पक्ष बांधणीच्या आड दुसरे पक्ष कुणी असतील तर त्यांना तुडवा आणि पुढे व्हा, मी मुंबईतून फौज फाटा पाठवतो वकिलांची फौज उभी करतो, असं म्हणत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या उत्साहात फुंकार भरली. येत्या काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा टाइट बांधतो की कुणी हात लावू शकणार नाही, असं देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

लांजा इथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी कार्यकर्ताना आदेश दिले आहेत. कोकणात संघटनात्मक बांधणीसाठी आलोय. गाव तिथे शाखा काढायची आहे. मनसे कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवली जात आहेत, असंही राज ठाकरे यांनी मेळाव्यात सांगितलं.

error: Content is protected !!