ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कौतुकाचे पूल बांधत दिला स्नेहीजनांनी निरोप – डॉ उज्ज्वला जाधव मुंबई विद्यापीठाच्या प्रदीर्घ सेवेतून झाल्या निवृत्त !


मुंबई विद्यापीठात डॉ. उज्ज्वला जाधव, जीवविज्ञान विभागाच्या प्रमुख, यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ अत्यंत हर्षोल्लासाच्या वातावरणात संपन्न झाला. डॉ उज्वला जाधव यांच्या स्नेहीजनांनी सत्कार समारंभात त्यांच्या कौतुकाचे जबरदस्त पूल बांधत गुणवर्णनांची बरसात केली. विद्यापीठातील बहुसंख्य विभागाचे विभाग प्रमुख, अधिष्ठाता, संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबरच अनेक संस्था आणि सामाजिक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सुरुवातीलाच फुलांची उधळण करीत व्यासपीठापर्यंत शुभेच्छांचा वर्षाव केला आणि सभागृहात विभागातील प्राध्यापक डॉ. इंदू जॉर्ज, डॉ. सुरुची जामखेडकर, भक्ती, संपदा आणि बबीता यांनी डॉ ‌ उज्ज्वला जाधव यांना ओवाळून औक्षण केले. या भरगच्च कार्यक्रमास अनेक दिग्गजांची हजेरी आणि अनेक शुभेच्छा संदेशा सोबतच पुष्पगुच्छांनी स्वागत करून मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांचे प्रेम आणि आदर व्यक्त केले. आणी डॉ. उज्ज्वला जाधव यांना सुखी, निरोगी आणि दीर्घायुष्याच्या शुभकामना दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे होते. या समारंभात विभागांतर्गत विविध व्यक्तींच्या मोठ्या संख्येने, शिक्षकांनी, मित्रपरिवार आणि कुटुंबांच्या सहभागाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले .
आदरातिथ्यांमध्ये डॉ. उज्ज्वला जाधव यांच्या कुटुंबाचे सदस्य, त्यांचे पुत्र, प्रसिद्ध निर्माता निर्देशक, अभिनेता आणि दिग्दर्शक निखिल नमीत जाधव, आणि त्यांची पत्नी निशा निखिल नमीत जाधव, प्रविण वराडकर होते. तसेच मुख्यमंत्र्यांचा शुभ संदेश वाचून तसेच त्यांनी पाठविलेली शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र विधानपरिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रतिनिधींनी दिलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखवला, ज्यांनी डॉ. उज्ज्वला जाधव यांच्या प्रतिष्ठित कारकिर्दीचा गौरव केला. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य वयाच्या ८२ व्या वर्षीही कार्यक्रमास येऊन आशीर्वाद देतात आणि आपल्या कामाच्या आठवणींचा ठेवा पुस्तक रुपाने प्रकाशित करा, अशी प्रेमाची विनवणी करतात तेंव्हा सभागृह भारावून गेले .
काहींनी त्यांच्या अनुपस्थितीत या कार्यक्रमात डॉ . उज्ज्वला जाधव यांच्या साठी आपल्या भावनात्मक शुभेच्छा आणि पत्रे पाठवून त्यांच्या प्रति श्रद्धा आणि आदर व्यक्त केला. समाजातील वेगवेगळ्या व्यक्तींनी डॉ. उज्ज्वला जाधव यांच्या विज्ञानातील संशोधनातील महत्त्वाच्या योगदाना बरोबरच त्यांच्या प्रभावी सामाजिक राजकीय नेतृत्व गुणांचे तोंड भरून कौतुक करुन विद्यापीठाच्या बाहेरच्या विश्वात करीत असलेल्या कार्याची दखल घेण्यात आली.
समारंभात, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, आणि मान्यवर अतिथींनी दिलेल्या अत्यंत संवेदनशील भाषणांद्वारे, डॉ . उज्ज्वला जाधव यांच्या वर अप्रतिम शेरो शायरी आणि सुंदर कविता करुन त्यांनी डॉ. उज्ज्वला जाधव यांच्या जीवविज्ञान क्षेत्रातील अमूल्य योगदानांचे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी केलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाबरोबरच त्यांचे जीवन उंचावण्याचा प्रयत्न करण्याच्या आणि त्यांच्यावर विद्यार्थ्यांच्या अविचल असलेल्या विश्वासाची प्रशंसा केली. त्यात अंकिता, प्रीती , सिल्वेस्टर आदित्या, प्रेरणा, कबुंगिरी, सुप्रिया मिताली, सुश्रुत , ऋषिकेश, अंजना कुलकर्णी, अनिता चव्हाण, दिनेश, संदीप कोलते , विवेक, डॉ. निशा शाह, डॉ. सुरुची, डॉ. हिना यांनी आपले उत्कट भाव प्रदर्शित करुन हृदयद्रावक भाषण केले आणि “विल फॉरगेट यू नॉट” असे पाझरणारे प्रेमाने ओतप्रोत भरून वाहिलेले संदेश दिले . संगीत कलाकारांनी तर या उत्सवी माहोलाची उंची वाढवित, लोक कला अकादमीचे प्रमुख, डॉ. गणेश चंदनशिवे यांनी तयार केलेल्या बाजीराव मस्तानी सिनेमाचे गाणे ‘नव तुनी आली अप्सरा’ आपल्या पहाडी आवाजात गाऊन गाण्यातूनच सर्वांगीण अभिवादन केलं.

डॉ. भास्कर जाधव, जीकेएस कॉलेजचे प्रिन्सिपॉल यांनी त्यांच्या करिअर चे मुक्त कंठाने कौतुक केले आणि त्यांचा सर्वांगीण आदर्श सर्वांनी घ्यायला हवा असे आवाहन केले. डॉ. अनुराधा मुजुमदार डीन ऑफ सायन्स यांनी त्यांच्या भाषणात आवर्जून त्यांच्या निसर्ग प्रेमावर आणि कलिना कॅम्पस संवर्धनाबाबत आणि त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वा बाबत आवर्जून उल्लेख करीत भाष्य केले. डॉ. स्मिता शुक्ला ज्यानी विद्यापीठाच्या न्याक मूल्यांकन कमिटीच्या प्रमुख म्हणून धुरा सांभाळली विद्यपीठाला ए++ हा दर्जा प्राप्त झाला आणि ते काम करत असतांना त्यांना आलेल्या अनुभवातून त्यांनी डॉ. उज्ज्वला जाधव यांच्या कार्यप्रणालीची प्रशंसा करीत त्यांच्या विद्यापीठ आणि विभागात केलेल्या कामाची विशेष दखल घेऊन आभार व्यक्त केले . ब्राह्मण समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रमुख प्रवक्ता श्री संजय कुलकर्णी यांनी या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहून त्यांच्या उत्स्फूर्त भाषण शैलीतून शुभ संदेश देऊन त्यांचे मनोगत व्यक्त करीत अभिष्टचिंतन केले आणि “थक कर यू ना बैठ, सदी खत्म हुई तो क्या उड्डाण अभी बाकी है … “ असे म्हणत सेवा निवृत्तीचा असा एवढा भव्य सोहळा मी कधी कुठे पहिला नाही . या मॅडम विद्यार्थ्यांच्या खूप जिव्हाळ्याच्या व्यक्ती आहेत असे त्यांच्यावर विद्यार्थ्यांनी केलेल्या अनेक भाषणातून प्रकर्षाने जाणवले. अमरावती येथून आलेलेले श्री संजय आठवले, डॉ. चौधरी यांनी त्यांच्या तडफदार नेतृत्व गुणांचे हृदयातून कौतुक करुन “नाना रतन वसुंधरा मे, . . रत्न राशी की क्या किमती, हृदय बिना सागर तडीपे क्या कहता है मोती”, हा मौल्यवान मोती आपल्या या विभागास लाभल्या आहेत, असे उदगार काढले. प्रमोद खंदारे नागपूर हून आवर्जून येत विशेष अतिथी म्हणून उपस्थित झाले होते. डॉ. इंदू जॉर्ज यांनी त्यांच्या कमाच्या धडाडीचे आणि त्यांच्या शब्दाला खूप किंमत आहे. त्या जे म्हणतात ते त्या करूनच दाखवितात अशी त्यांची निर्भीडता नमूद केली. डांगे यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार मानत तुमचा प्रेरणादायी सहवासाला आम्ही सर्व मुंबई विद्यापीठाचे कर्मचारी मुकणार, असे भावपूर्ण उदगार काढले . डॉ. अहमद अली यांनी “कभी आल्विदा ना कहेना “म्हणत शुभेच्छा दिल्या . माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख, यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. उज्ज्वला जाधव यांच्या प्रतिष्ठित करिअरच्या कार्यकाळात केलेल्या कामांबद्दल विशेष विचार व्यक्त केले . त्यानी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक भावपूर्ण असे किस्से भाषांतून सांगून या प्रसंगानुरूप मराठी गाणे “ऐकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी “ सादर करुन या कार्यक्रमाचा सुंदर असा समारोप केला .
डॉ. उज्वला जाधव यांचा सेवा निवृत्ती समारंभ हा केवळ त्यांच्या मुंबई विद्यापीठातील कामाचे, मार्गदर्शनाचे आणि नेतृत्वाचे चांगले आणि सापेक्ष प्रतीक वाटले नाहीतर समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तींचा आदर्श स्वकर्तृत्वानेस्थापित करणाऱ्या या गुरुवर्यांचा सन्मान सोहळा होता. जीवनातील एका नवीन प्रवासासाठी प्रस्थान करतांना, त्यांचे सहकर्मी, विद्यार्थी आणि अनुगामी यांनी त्यांच्या आत्मिक संतोषाच्या आणि आनंदाच्या निवडक विद्यार्थ्यांनी दिलेल्या त्यांच्या ह्रुदयातील शुभेच्छा येतात. मुंबई विद्यापीठातील त्यांच्या गांभीर्याने केलेल्या कर्त्यव्याची आणि परिपूर्ण योगदानांची दखल सर्वच घटकांनी घेतली आणि विद्यापीठातील सर्वच संघटनांनी आवर्जुन उपस्थिती दर्शवून मनोगत व्यक्त केले. डॉ. बालाजी केंद्रे, डॉ. विश्वंभर जाधव सेनेट मेंबर, डॉ अनिता चौधरी, डॉ अर्चना मॅडम, डॉ ए के रंजन, डायरेक्टर डॉ. समाधान शेळके , श्री अमर गुरव , विद्यापीठ सिक्योरिटी प्रमुख श्री खरात आणि अनेक शुभेच्छा दिल्या . या प्रसंगी विभागातील हेड क्लार्क पंकज कुचेकर आणि सर्व कर्मचारी . एम एससी पार्टवन – पार्टटू आणि पीएडी चे सर्व विद्यार्थी यांचा सहभाग उल्लेखनीय होता . डॉ. उज्ज्वला जाधव यांनी आपल्या कारकिर्दीला उजाळा देत सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त केले .

error: Content is protected !!