[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

संभाजी भिडे याला महिला आयोगाची नोटीस

मुंबई/ तू अगोदर कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलेन असे एका महिला पत्रकाराला सांगणाऱ्या संभाजी भिडे याला राज्य महिला आयोग नोटीस पाठवणार आहे.
संभाजी भिडे यांनी काल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यापूर्वी तुम्ही मंत्रालयात कोणाला भेटायला आले

होते असता प्रश्न एका महिला पत्रकाराने संभाजी भिडे याना विचारताच ती अगोदर कुंकू लाऊन ये.प्रत्येक स्त्री भारतमाता आहे आणि भारतमाता कधीच विधवा नसते असे विधान भिडे यांनी केले .त्यांचे हे विधान महिला वर्गाचा अपमान करणारे आहे असे म्हणत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिडे ला नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले .

error: Content is protected !!