ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामुंबईराजकीय

माझ्याकडे १०० कोटींच्या खंडणीबाबत कोणताही पुरावा नाही/ परमवीर सिंह.. अनिल देशमुख सुटणार ?


मुंबई/ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आता सपशेल माघार घेतली असून माझ्याकडे देशमुख यांच्या विरोधातील कुठलेही पुरावे नाहीत असे प्रतिज्ञापत्र त्यांनी काल चौकशी आयोगाच्या समोर सादर केले . त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे .
परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता . दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करून देण्याचे त्यांनी टार्गेट दिले होते आणि सचिन वाजे यांच्यावर वसुलीची जबाबदारी सोपवली होती असा आरोप परमवीर सिंह यांनी त्यांच्या पत्रात केला होता .त्यामुळे देशात मोठी खळबळ माजली होती या प्रकरणी परमवीर सिंग हे सर्वोच्च न्यायालयात सुधा गेले होते .मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जायला सांगितले दरम्यान यावप्रकर्णी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय ने अनिल देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले .त्यानंतर देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला देशमुख यांनी आपल्यावरील गुन्हे रद्द करण्यासाठी अगोदर उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयातही गेले होते तर दुसरीकडे इडीने अनिल देशमुख यांना तब्बल पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीला हजार राहिले नाही . या काळात त्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर तीन वेळा धाडी टाकण्यात आल्या पण देशमुख गायब झाले होते तर दुसरीकडे देशमुखांच्या वर आरोप करणारे परमवीर सिंग हे सुधा देश सोडून पळाले होते .याच दरम्यान अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या ते ई डी समोर हजार झाले त्यानंतर ई डी ने त्यांची सलग १३ तास चौकशी करून त्यांना अटक केली .सध्या देशमुख अटकेत आहेत दरम्यान या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगा समोर काल परमवीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून माझ्याकडे अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुरावे नाहीत असे वकीला मार्फत सांगितले . त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग खुला झाला आहे .

error: Content is protected !!