ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ड्रग्ज तस्करांच्या पलायन प्रकरणी ९ पोलीस कर्मचारी निलंबित

पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय ३४) याने पोलिसांना चकवा देवून पलायन केले होते. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली असून एका अधिकाऱ्यासह तब्बल 9 जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे
ललित पाटील ड्रग्स विक्री प्रकरणी ४ कर्मचारी आणि महिला अधिकाऱ्यासह 5 जणांचे निलंबन करण्यात आलं. ललित पाटील हा ड्रग्स तस्करीप्रकरणातील कुख्यात आरोपी होता. काल संध्याकाळी ६ वाजता ललित हा ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेला होता.
याप्रकरणी आता पुणे पोलीस आयुक्तांनी कर्तव्यात कसूर करून कामामध्ये हालगर्जीपणा केल्यामुळे ही निलंबनाची कारवाई केली आपीएसआय जनार्दन काळे, पीसी विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे, दिगंबर चंदनशिव, पीएसआय मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, नाईक नाथाराम काळे, शिपाई पिरप्पा बनसोडे, शिपाई आमित जाधव

error: Content is protected !!