ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिकामुंबई

पालकांचे संमतीपत्र असेल तरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश आजपासून शाळा सुरू


मुंबई/ कोरोणच्य भीतीमुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा आजपासून सुरू होत आहेत मात्र शाळेतील प्रवेशासाठी पालकांचे समतीपत्र बरोबर आणणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे शहरी भागात आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावी पर्यंतच्या वर्गाना परवानगी देण्यात आली असून सर्व शाळा एक दिवस आड सुरू राहतील
सध्या करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालाय त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे व्यापार उद्योग आणि परिवहन सेवाही सुरू आहेत त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता त्यानुसार करोना प्रतिबंधक सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली त्यानंतर शाळांचे निर्जंतुकीकरण तसेच साफ सफाईचे काम हाती घेण्यात आले होते आणि आज शाळांची घंटा वाजणार आहे मुंबईतील जवळपास दोन हजार शाळांमध्ये पाच लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत यातील आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्या साठीच शाळा आजपासून सुरू होतील सकाळी शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे द्वारा शरीरातील ऑक्सिजनची पातळी चेक केली जाईल त्यानंतरच त्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल एका बाकावर फक्त एकच विद्यार्थी असेल जर शाळा प्रवेशाच्या वेळी कुणी आढळले तर त्यांना तेथेच करोनटाईन केले जाईल मुंबईतील सर्व शाळा कोवीड जोडण्यात आल्या आहेत तसेच सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे senetayzar छा वापर साबणाने हात स्वच्छ धुणे तसेच सोशल ristenschya नियमांचे काटेकोरपणे पालन करणे याबाबतची सर्व जबाबदारी शाळांवर सोपवण्यात आली आहे मात्र शाळा सुरू झाल्या तरी काही पालकांच्या मनात भीती असल्याने इतक्यात आम्ही मुलाना शाळेत पाठवणार नाही असे त्यांनी सांगितले तर काही पालकांनी मात्र शाळा सुरू होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला

error: Content is protected !!