ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेमहाराष्ट्र

भिवंडीत गौरीपाडा व अंबिका नगरात सुरु झाले श्रावणी तीन पत्ती काठी लाठी जुगार, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, पोलीस निंद्रावस्थेत …

भिवंडी (प्रतिनिधी )  दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी भिवंडी शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी तीन पत्ती श्रावणी क्लब लाठी क्लब काठी आणि पत्ते क्लब भोईवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गौरीपाडा याठिकाणी भिवंडीतील  जुगार माफिया यांच्या संयुक्त भागीदारीतून खुलेआम तीन पत्ती जुगार सुरू झाला आहे.खासकरून  मुंबई, उल्हासनगर,ठाणे आणि गुजरात वरूनही खास महिला खेळाडू यात सहभाग घेत आहे.

भोईवाडा पोलिसांचे यात अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे.रात्रीच्या अंधारात भोईवाडा पोलिस स्टेशनच्या बीट मार्शल आणि डीबी चे लोक या जुगार अड्डा च्या बाजूला घरट्या घालताना आमच्या प्रतिनिधींना दिसून आले आहे .मात्र  कारवाई  शून्य आहे.आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार खास पोलिसांसाठी मद्याची पॅक हे ठिकाणी भरलेले असतात.

तशीच अवस्था निजामपूर पोलीस स्टेशनच्या अंबिकानगर येथे आहे या ठिकाणी जुगाराच्या क्लब बरोबरच असलियतचा बाजार मांडला आहे.  उच्चभ्रु आणि चांगल्या व्यापारी लोकांची वस्ती असलेला अंबिकानगर मध्ये रात्रीच्या अंधारात अगदी तोकड्या कपड्यात जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या महिला नेमक्या  कोण आहे आणि कुठून येतात याचा शोध निजामपुरा पोलिसांनी घ्यायला हवा. गणेशोत्सवात सुरू होणाऱ्या या जुगाराच्या अड्यामुळे  अनेक वेळा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे .दोन राजकीय गटात वाद झाले आहे याची सर्व कल्पना भोईवाडा आणि निजामपुरा पोलिसांना असतानासुद्धा फक्त आर्थिक हव्यासापोटी व पैशाच्या भुकेसाठी खुले आम परमिशन या जुगार माफियांना देत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करीत  आहे. .त्यामुळे या गंभीर बाबीकडे ठाणे पोलीस आयुक्त केव्हा लक्ष देऊन कडक कारवाई करणार का? .असा प्रश्न सुद्धा सुज्ञ नागरिक करीत आहे..

error: Content is protected !!