ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पंडित नेहरू आरक्षण विरोधी होते – शशी थरूर

नवी दिल्ली/काँग्रेसचे नेते तथा प्रसिद्ध लेखक शशी थरूर यांचे आवर लिव्हिंग कॉन्स्ट्युटसन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने शशी थरूर आणि माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यात संवाद झाला. दरम्यान, याच कार्यक्रमावेळी थरूर यांनी मोठं विधान केलं आहे. आरक्षणावर बोलताना भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते, असे विधान केले आहे.
यावेळी बोलताना तरुणी पिढी आणि माध्यमांवर भाष्य केले. सरकारने माध्यमांत हस्तक्षेप करू नये. सरकारकडे राजकीय अजेंडा असतो, असे मत थरूर यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी भारतातील आरक्षण व्यवस्था आणि पंडित नेहरू यांचा दृष्टकोन यावरही भाष्य केले. पंडित नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते. पण त्यांनी युसीसीअर्थात समान नागरी कायदा आवश्यक आहे, असे सांगितेल होते, असे मत व्यक्त केले.
समान नागरी कायद्यावर बोलताना त्यांनी उत्तराखंडच्या युसीसी कायद्यातील काही कलमे हास्यास्पद आहेत. ‘लिव्ह-इन’ बाबतचे कलम मला मान्य नाही, असेही थरूर यांनी स्पष्टपणे सांगितले. बहुतेक देशांकडे समान नागरी कायदे आहेत, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.आजही हजारो खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. यावर बोलताना कोर्टांमध्ये प्रकरणांचा ढीग वाढतोय, ही परिस्थिती अविश्वसनीय आहे. एआय वापरून काही मार्ग काढता येईल का? ते पाहता येईल, असे मत थरूर यांनी व्यक्त केले.
याच कार्यक्रमात माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनीही वेगवेगळ्या विषयांवर आपले मत व्यक्त केले. संविधान हे समान नागरी संहितेची भावना व्यक्त करते. माझा अस म्हणणं आहे की किमान ७५ वर्षांच्या संविधानानंतर संविधानाची महत्त्वाकांक्षा आणि ध्येय साध्य करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, असे मत चंद्रचूड यांनी व्यक्त केले. परंतु समान नागरी कायदा लागू करताना आपण आपल्या समाजाला विश्वासात घेतले पाहिजेय हे खरोखरच राष्ट्र म्हणून समाजाच्या भविष्याच्या हिताचे आहे, असे सांगितले पाहिजे हेही चंद्रचूड यांनी आवर्जून सांगितले

error: Content is protected !!