[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका अधिकारी संजय जयस्वाल यांची अकरा तास ईडी कडून चौकशी


मुंबई/कोविड घोटाळ्यात महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त व म्हाडाचे बडे अधिकारी संजीव जैस्वाल त्याचबरोबर कंत्राटदार आणि मध्यस्थी यांचे आता दिवस भरलेले आहेत कारण त्यांच्या ईडीने संपत्तीचा पंचनामा करायला सुरुवात केली आहे . संजीव जयस्वाल आणि इतर लोकांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते या छाप्यानंतर संजीव जयस्वाल यांची ११ तास इडीने चौकशी केली या छाप्यात संजीव जयस्वाल यांच्याकडे शंभर कोटी होत बेनामी मालमत्ता असल्याचे ईडीला समजले आहे. दरम्यान ही संपत्ती मला सासरवाडी करून मिळाली आहे .हा जयस्वाल यांनी दावा दाखल गेला असला तरी आता त्यांच्या या दाव्याची कसून चौकशी करीत आहे या चौकशीत जर तथ्य आढळले नाही तर जयस्वाल यांची कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते .त्याचबरोबर पालिकेचे काही कंत्राटदार यांनी कोविड घोटाळ्यात वैद्यकीय साहित्य पुरवण्याच्या पाहण्याने कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केलाय अशा अनेक कंत्राळदारांना आणि त्यांच्याशी साठे लोटे असलेल्या पालिका अधिकाऱ्यांना त्यांना अटक ही होऊ शकते कोविड काळात तब्बल 12 हजार कोटींचा घोटाळा झाला होता आलिया घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे दोन नेते सुजित पाटकर आणि सुरत चव्हाण यांची यापूर्वीच पिढीने चौकशी केलेली असून त्या दोघांकडेही मालमत्ता सापडलेली आहे त्यामुळे त्या दोघांना अटक होण्याची शक्यता आहे सध्या कोविड घोटाळ्याची कसून चौकशी करीत आहे चौकशीत पालिकेचे अनेक अधिकारी रडार वर आहेत

error: Content is protected !!