ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बारबालांना नाचविणाऱ्या बारवाल्यांवर कारवाई


बारचा मालक, मॅनेजर, वाद्यवृंदाचा वादकासह २३ जणांवर कारवाई

डोंबिवली :पश्चिमेकडील कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या महाराजा बार अँड रेस्टॉरंटमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली ताल नावाने ओळखला जाणारा हा बार पहाटे उशिरापर्यंत चालतो. या बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नृत्यांगना तोकड्या कपड्यांमध्ये अश्लील अंगविक्षेप करत थिरकत असतात. दिलेल्या परवान्यामधील अटींचे उल्लंघन करून बारमध्ये वेटर म्हणून ठेवण्यात आलेल्या बारबालांचे नोकरनामे नसताना, तसेच परवानगी नसतानाही कानठळ्या बसविणाऱ्या डीजेच्या मोठ्या आवाजात अश्लील व विभित्स हावभावाचे नृत्य करत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी या बारवर पाळत ठेवली होती.

कल्याण शहराच्या मध्यवर्ती परिसरात मुरबाड रोडला असलेल्या महाराजा बार अँड रेस्टॉरंट तथा ताल बारवर पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या खास पथकासह महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धाड टाकून २३ जणांवर कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान ६ कथित गायिका, १७ पुरूष ग्राहक, बारचा मालक, मॅनेजर आणि वाद्यवृंदाचा वादक अशा २३ जणांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बारबालांना नाचविणाऱ्या बारवाल्यांची धाबे दणाणले आहेत.
     
अखेर पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांची धाड पडताच तेथे बसलेल्या आंबटशौकिनांची बोबडी वळली. हा बार शासनाने दिलेल्या परवानगीच्या विहित वेळेपेक्षा जास्त वेळ अर्थात १.४० पर्यंत चालू असल्याचे आढळून आले. या बारमध्ये ६ महिला गायिका तोडक्या कपड्यांमध्ये अश्लील अंगविक्षेप करत नृत्य करताना, तर या नृत्यांगणांवर मदहोश झालेले मद्यपीही नोटांची उधळण करताना आढळून आले.

error: Content is protected !!