ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

लाऊड स्पीकर वरील अजान वर बंदी घाला!- बाबुभाई भवाणजी

मुंबई/ध्वनी प्रदूषणामुळे मशिदिंमधून लाऊड स्पीकर वर दिल्या जाणाऱ्या अजाण वर बंदी घाला अशी मागणी मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.
पोलीस आयुक्तांना लिहलेल्या पत्रात बाबूभाई भवानजी यांनी म्हटले आहे की ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नेहमी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.मात्र तरीही वेगवेगळ्या कारणाने मुंबईकरांना ध्वनी प्रदूषणा चा समस्येचा सामना करावा लागत आहे. यापैकीच एक कारण आहे मशिदी मधून लाऊड स्पीकर वरून दिली जाणारी अजाण!मात्र लाऊड स्पीकर वरच्या या अजाण मुळे ध्वनी प्रदुषण होत असते आणि मुंबई करांच्या याच भावना पोलीस आयुक्त पर्यंत पोचविण्याचे काम भाजप करीत आहे. आपल्या पत्रात बाबूभाई भवन जी यांनी हिंदूंच्या सनांवरचे निर्बंध हटवण्याची मागणी केली आहे

error: Content is protected !!