ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महापालिका

इमारत मुकादम लाच घेताना अटक

  मुंबई-अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी  पन्नास हजाराची लाच मागून पंचेचाळीस हजारावर तडजोड करणारे मुंबई महापालिकेतील सी वार्डातील इमारत मुकादम कृष्ण पवार यांना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली .
      घोगरी मोहल्ला इस्माईल कर्टे मार्ग वर सुरू असलेल्या एका बांधकाम साईटला काही दिवसांपूर्वी भेट दिली असता तिथे दोन मजली बांधकाम करून नंतर पत्र्याचे शेड बांधकाम सुरू असल्याने निदर्शनास आले . मात्र त्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेची नोटीस बजावण्यात आली होती . यानंतर पवार त्यांना भेटण्यासाठी गेले असता बांधकामावर कारवाई न करण्यासाठी पन्नास हजार रुपये मागितले .  लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर पालिका कार्यालयात सापळा लावत रंगेहात पकडले .

error: Content is protected !!