[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

भायखळ्यात विद्यार्थी गुणगौरव सोहळा


मुंबई/भायखळ्याच्या श्री सावता माळी वन ट्रस्ट तर्फे, समाज मंदिर हॉलमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अभिनेते अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला, विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य दिलीप पांढरपट्टे उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .तसेच विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासासाठी कशा रीतीने योगदान द्यायला हवे याबाबत उपस्थितांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने उद्याच्या भारताचा आधारस्तंभ आहे .त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजाविषयी, कुटुंबाविषयी ,आणि देशाविषयी आपली जबाबदारी कशा पद्धतीने भविष्यात पार पडायला हवी याबाबत उपस्थितीने मार्गदर्शन केले. त्या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष शरद शंकर अभंग, सरचिटणीस हेमंत पांडुरंग मंडलिक ,विश्वस्त संदीप चंद्रकांत मंडलिक चंद्रकांत सहदेव वराडी आणि व्यवस्थापक सदानंद बाळ लिंग पोहेकर यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते

error: Content is protected !!