९ सप्टेंबरला उपराष्ट्र पदाची निवडणूक
नवी दिल्ली/जगदीप धनखड यांनी काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार येत्या सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. याच दिवशी मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठीी २१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. त्यामुळे आता देशाच्या उपराष्ट्रपतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार सप्टेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येतील. २५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज वापस घेता येणार आहे. ९ स्पटेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होईल आणि याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.
