पंतप्रधान किसान संपदा योजनेचा बजेट वाढवला! शेतकऱ्यांना दिलासा
नवी दिल्ली/केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचे बजेट वाढवून ६५२० कोटी रुपये करण्यात आले आहे. यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ साठी २००० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे सहकारी संस्था मजबूत होण्यास फायदा होणार आहे.
प्रधानमंत्री किसान संपदा योजना शेतकऱ्यांसाठी असणारी भारत सरकारची महत्वाची योजना आहे. या योजनेचा हेतू देशातील कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे हे आहे. याद्वारे कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जातो. आता यासाठी ६५२० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री किसान संपदा योजनेसाठी २०२१/२२ ते २०२५/२६ या कालावधीसाठी १९२० कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चासह एकूण ६५२० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. १९२० कोटी रुपयांची रक्कम बहु-उत्पादन अन्न विकिरण युनिट्स आणि घटक योजनेअंतर्गत १०० एन ए बी एल अन्न चाचणी प्रयोगशाळा बांधण्यासाठी वापरली जाणार आहे. तसेच पी एम के एस वाय च्या विविध घटक योजनांअंतर्गत प्रकल्पांसाठी ९२०कोटी रुपये वापरले जाणार आहेत.
मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ४ रेल्वे मार्गांसाठी १११६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इटारसी ते नागपूर या चौथ्या रेल्वे मार्गासाठी ५४५१ कोटी रुपये, अलुआबारी रोड ते न्यू जलपाईगुडी रेल्वे मार्गासाठी १७८६ कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी २१८९ कोटी रुपये आणि डांगोआपोसी-करौली रेल्वे मार्गासाठी १७५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.