[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

..तर तंगड्या तोडून हातात देऊ प्रसाद लाडला सेनेचा प्रसाद


मुंबई- कधी कधी माणूस आपली पात्रता नसतानाही नको त्या बढाया मारीत असतो. असाच काहीसा प्रकार भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या बाबतीत घडलाय वेळ आली तर शिवसेना भवन तोडू अशा फुशारक्या मारणाऱ्या प्रसाद लाड याला आता शिवसैनिक प्रसाद द्यायला सज्ज झालेत. शिवसेना नेत्यांनी प्रसाद लाड ची खरडपट्टी काढताना शिवसेनेच्या कृपेने आमदार झालास आणि शिवसेना भवन तोडायला निघालास .शिवसेना भवन तोडायचे तर लांबच राहिले तिथल्या फुटपाथवर पाय ठेऊन दाखव तुझ्या तंगड्या तोडून हातात देऊ असा इशाराच शिवसैनिकांनी दिल्यामुळे प्रसाद लाडची चांगलीच घाबरगुंडी उडाली असून माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला अशी सारवासारव आता प्रसाद लाड करीत आहे..

error: Content is protected !!