ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

बेस्टची अखेर भाडेवाढ जारी


मुंबई – बेस्टचे भाडे एक रुपयापासून १२ रुपयांपर्यंत वाढवण्यास बेस्ट समितीने मंगळवारी मंजुरी दिली. पालिकेच्या सभागृहात मंजुरी मिळण्याची औपचारिकता पार पडल्यानंतर ही भाडेवाढ लागू होईल.
बेस्ट परिवहन उपक्रम डबघाईला आल्यामुळे त्याला आर्थिक मदत मिळावी, यासाठी महापौरांच्या मध्यस्थीने पालिका आयुक्तांशी तीन विशेष बैठका झाल्या. आयुक्तांनी बेस्टला थेट आर्थिक मदत देण्यास नकार दिला; परंतु बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यात बेस्ट भाडेवाढीची सूचना होती. तिला बेस्ट समितीने आज मंजुरी दिली. याबरोबरच बसमार्गांची पुनर्रचना करण्यासही मंजुरी देण्यात आली.
बेस्ट मधील ब श्रेणी अधिकाऱ्यांचे कार्यभत्ते खंडित करणे, मनुष्यबळाचे नियोजन, शिक्षणासाठी कामगारांच्या मुलांना देण्यात येणारे अर्थसाह्य बंद करणे, शिष्यवृत्ती बंद करणे, गृहकर्जावरील अर्थसाह्य योजना बंद करणे, अ श्रेणी अधिकाऱ्यांची संख्या कमी करणे, वाहतूक भत्ता बंद करणे, वाहन कर्ज बंद करणे, नैमित्तिक रजेचे रोखीकरण स्थगित करणे, प्रोत्साहन भत्ते गोठविणे, अ आणि ब श्रेणीतील अधिकाऱ्यांचा प्रवासभत्ता बंद करणे या सुधारणांना बेस्ट समितीने मंजुरी दिली. मान्यताप्राप्त संघटनेशी निगडित असलेल्या कामगारांचा महागाई भत्ता गोठविणे, वैद्यकीय भत्ता खंडित करणे, उपहारगृह कंत्राटदारांना देण्यात येणारी सबसिडी गोठवणे, कर्मचारी-अधिकाऱ्यांची रजा, प्रवास साह्य भत्ता गोठविणे, रोख रक्कम हाताळणी भत्ता बंद करणे या योजनांबाबत मात्र बेस्ट समितीने कोणताही निर्णय घेतला नाही.
बेस्ट उपक्रम टिकला तर कामगार जगेल, हे लक्षात घेऊन कामगारांना जगविण्यासाठी आम्हाला हा कटू निर्णय घ्यावा लागत आहे. आयुक्तांनी सुचविलेल्या उपाययोजना स्वीकारणे ही आपली जबाबदारी आहे असेही ते म्हणाले

error: Content is protected !!