[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
मुंबई

मुंबईकरांची दिवाळी जोरात

मुंबईकरांची दिवाळी जोरात दादरसह सर्व मार्केट फुल
कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे तसेच उद्योगधंदे आणि दुकाने सुरू झाल्याने लोक मोठ्या संख्येने दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत त्यामुळे मुंबईतील दादर,क्रोफेड मार्केट, बंद्रा मालाड मुलुंड घाटकोपर आदी प्रमुख ठिकाणची मार्केट ग्राहकांच्या गर्दीने फुलली आहेत शनिवार रविवार या दोन दिवशी ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडणार असल्याने दुकानेही सजलेली दिसत आहे काल शनिवारी दादरचे फुल मार्केट ग्राहकांनी फुलले होते कपडे रोषणाईच्या साहित्य रांगोळी आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती त्यामुळे शनिवारी दुकानदारांच्या चांगला धंदा झाला गेल्या वर्षी क रोणा आणि लॉक डाऊन मुले सर्व काही बंद होते पण यावेळी मात्र सर्व खुले झाले आहे त्यामुळे गणेशोत्सव दसरा आणि नवरात्रोत्सव भलेही मोठ्या उत्साहात साजरा करता आला नाही तरी दिवाळी मात्र धूमधडाक्यात साजरा केली जाणार आहे त्यातच फातक्यांवर बंदी नसल्याने दिवाळीचा उत्साह आणखी द्विगुणित झाला आहे

error: Content is protected !!