ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

देशविरोधी पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध रायगडमध्ये सर्वपक्षीय आंदोलन


पेण/रायगडमधील एका तरुणाने देशविरोधी पोस्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रायगडच्या पेणमधील एका तरुणाने देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर पेण शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी त्याच्याविरोधात निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणाची पेण पोलिसांनी दखल घेतली असून त्याच्यावर भा. न्या. स. कलम ३५३,१ख व ३५३ ( २) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी पुढील तपास सुरु केलाय.
तरुणाने आपल्या इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवरून देशाविरुद्ध चिथावणीखोर विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे पेण मधील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी याचा जोरदार निषेध केला आहे. पेण नगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर पाकिस्तानचे बॅनर पायाखाली तुडवून नीम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम अशा घोषणा देत ही निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी असंख्य नागरिक या निषेध रॅलीत सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, रायगडपूर्वी पुण्यातील एका तरुणाने देखील देशविरोधी पोस्ट केली होती. पुण्यात वास्तवात असलेल्या तरुणीने पाकिस्तानच्य समर्थनार्थ पोस्ट केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी या तरुणीला अटक केली असून तिच्या कॉलेजनेही तिच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

error: Content is protected !!