[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

संजय राऊत यांना अटक

मुंबई/ ज्या संजय राऊत यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाचा रोष होता. त्या संजय राऊत यांना अखेर आज ई डी ने अटक केली.मात्र त्याच्या अटकेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने आंदोलन केले तर शिंदे गटाने आणि भाजपने आनंद व्यक्त केला
आज सकाळी ई डीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोचले आणि तब्बल त्यांनी संजय राऊत यांची साडे नव तास चौकशी केली मात्र ते चौकशीला सहकार्य करीत नसल्याचा आरोप करून त्यांना सायंकाळी 5 वाजता ई डी कार्यालयात आणण्यात आले .तत्पूर्वी राऊत यांच्या घरातून ई डी ने साडे अकरा लाख जप्त केले तसेच त्यांच्या घरातून काही कागदपत्रे सुधा जप्त करण्यात आली मात्र या कालावधीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी तसेच ई डी कार्यालय बाहेर शिवसेनेच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यां ई डी च्या आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते . दरम्यान उद्धव ठाकरे यांना त्रास देण्यासाठीच माझ्या अटकेचे षडयंत्र रचण्यात आले आहे पण मला फासावर लटकवले तरी शिवसेना सोडणार नाही असे संजय राऊत यांनी सांगितले . दरम्यान ई डी ने संजय राऊत याना आपल्या कार्यालयात आणल्या नंतर तिथेही त्यांची कसून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली त्यांच्या अटकेचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे . दरम्यान हे सर्व लाज शरम सोडून चाललेले आहे ही दमणशाही आहे त्यांनी लिहलेले रोखठोक मध्ये जे प्रश्न उपस्थित केले ते काहींना झोंबले म्हणून हे सर्व सुरू आहे असे उधाव ठाकरे यांनी सांगितले .

error: Content is protected !!