छटपूजा व पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींनी माफी मागावी! केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मागणी
पाटणा/बिहार विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात काँग्रेस नेते राहुल गांधी भाजपवर सडकून टीका केली आहे. गांधी यांनी’ नागरिकांना शिक्षण, आरोग्य आणि इतर गोष्टी संविधानामुळे मिळाल्या आहेत. मात्र नरेंद्र मोदी आणि आरएसएस त्यावर हल्ला करत आहेत. ते मते चोरतात तेव्हा ते त्यावर हल्ला करतात. ते भारतातील संस्थांना कमकुवत करत आहेत’ असा आरोप केला होता. याला आता भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उत्तर दिले आहे.
भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी आज सर्व मर्यादा ओलांडल्या आणि पंतप्रधान आणि छठ सणाबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. निवडणूक हरण्याच्या भीतीने त्यांनी अशी टीका केली. गेल्या दोन दशकांपासून बिहारमधील लोक त्यांच्या (राजद आणि काँग्रेस) जंगल राजच्या विरोधात मतदान करत आहेत. त्यांनी बिहारच्या तरुणांच्या आकांक्षा चिरडल्या आहेत असं प्रधान यांनी म्हटलं आहे.बोलताना प्रधान म्हणाले की, गांधी यांनी यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या आईचा अपमान केला होता. त्यांना नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारची प्रगती त्यांना सहन होत नाही. आता त्यांनी बिहारच्या पवित्र भूमीवरून छट या लोकश्रद्धेच्या महान सणाचा अपमान केला आहे. यामुळे लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. यातून राहुल गांधी यांचा सनातन संस्कृतीबद्दलचा द्वेष दिसून येत आहे.

 
								 
															 
															 
															