[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

गुजरातमध्ये लवकरच समान नागरी कायदा

नगर/गुजरात मध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीय याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये युनिफॉर्म सिव्हील कोड अर्थात समान नागरी कायदा लागू केला जाणार असल्याचे गुजरातचे मंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले . त्यासाठी एक समिती बनवली जाणार आहे आणि गुजरात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती या समितीचे अध्यक्ष असतील या समितीच्या माध्यमातून समान नागरी कायदा आणला जाणार असल्याने गुजरात मधील मुस्लिमांमध्ये अस्वस्थता पसरली आहे .सध्या गुजरात मध्ये केजरीवाल यांनी घुसखोरी केल्यापासून भाजपचे नेते सावध झालेत . स्वतः पंत प्रधान मोदी गुजरातचे दौरे करीत आहेत त्यामुळे सध्या गुजरात मधे राजकीय हालचाली वाढल्या आहेत .

error: Content is protected !!