ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

कोकाटेना अखेर अजितदादांचे अभय! मंत्रिपदी कायम


मुंबई/ विधानभवनात ऑनलाईन रमी खेळण्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर शनिदेव पावला.एखाद्या भुरट्या गुन्हेगाराला ज्याप्रमाणे पोलिस दम देऊन सोडून देतात अगदी त्याच पद्धतीने अजित पवारानी माणिकराव कोकाटेना केवळ तंबी देऊन सोडून दिले .त्यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद बचावले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकाटेबाबत मंगळवारी निर्णय घेणार होते. त्यानुसारवाज त्यांनी कोकाटेना बोलावून त्यांची कानउघडणी केली. मंत्री म्हणून कामगिरी सुधारा आणि वादांपासून दूर राहा, अशी समज देऊन अजित पवार तूर्तास तरी कोकाटेंना अभय देऊ दिले. ‘अजित पवारांनी कोकाटे यांच्या विभागाकडून कामांचा आढावा घेतलेला आहे. कृषी खात्यातील बहुतांश कर्मचारी वर्गानं कोकाटे यांच्या कार्यपद्धतीबद्दल सकारात्मक फिडबॅक दिला आहे,’ अशी माहिती पवारांच्या निकटवर्तीयांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व विभागांना १०० दिवसांचा कार्यक्रम आखून दिला. त्यात कोकाटे यांचा कृषी विभाग पहिल्या पाचमध्ये आला. कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी अनेक नव्या योजना राबवल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस हे कोकाटे यांच्या मंत्री म्हणून सुरु असलेल्या कामगिरीबद्दल समाधानी आहेत. पण त्यांच्या वादग्रस्त विधानांबद्दल फडणवीस यांची तक्रार आहे. कोकाटे यांनी मंत्रिपद स्वीकारल्यापासून खात्यात अनेक नव्या संकल्पना राबवल्या. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्यापक प्रमाणावर सुरु केला. त्यामुळे खर्चाला कात्री लागली आणि उत्पादन वाढलं. एआयच्या वापरामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार आहेत,’ अशी माहिती अजित पवारांच्या निकटवर्तीयांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.आयएएस अधिकारी व्ही. राधा यांना माझ्या विभागात सचिव म्हणून पाठवा, अशी विनंती करणारे कोकाटे हे एकमेव मंत्री असल्याची पुस्ती त्यांनी जोडली. ‘व्ही. राधा यांना कृषी मंत्रालयाच्या सचिव म्हणून जबाबदारी दिली जावी यासाठी कोकाटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. बहुतांश मंत्री राधा यांची त्यांच्या विभागातून बदली व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात. कारण राधा कामात भ्रष्टाचार आणि अपहार खपवून घेत नाहीत. बऱ्याच मंत्र्‍यांना कर्तव्यकठोर अधिकारी आवडत नाहीत. पण कोकाटे अपवाद ठरले आहेत,’ अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. कोकाटे यांच्या कार्यकाळात १.२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४६ हजार कोटी रुपये जमा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
कृषी मंत्री म्हणून कोकाटे यांनी त्यांच्या खात्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतलेले असले तरी त्यांच्या वादग्रस्त विधानांचीच चर्चा अधिक झाली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानं सांगितलं. ‘कोकाटे यांच्या विधानांमुळे कृषी विभाग पक्षाशी जोडलाच गेलेला नाही. पक्षाचे मंत्री त्यांचं काम करताना पक्षाला कशी मदत करतात याकडे अजित पवारांचं लक्ष आहे. यासाठी कोकाटे यांनी अजित पवारांना आश्वस्त केल्यास त्यांना मंत्री म्हणून काम करण्यासाठी अखेरची संधी मिळू शकते. पण अजित पवारांचा संयम आता संपत चाललेला आहे,’ अशी माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानं दिली.
मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांमुळे महायुतीची प्रतिमा मलिन होत आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस कमालीचे नाराज होते आज त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माणिकराव कोकाटे,योगेश कदम,भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांना पोस्ट कॅबिनेटमध्ये खडे बोल सुनावले .वादग्रस्त विधाने करू नका प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका अशी तंबी दिल्याचे समजते.

error: Content is protected !!