पंतप्रधान मोदींकडून लष्कराला ग्रीन सिग्नल – पाकिस्तान वर कोणत्याही क्षणी हल्ला होणार
नवी दिल्ली/पाकिस्तानवर निर्णायक हल्ला करण्यासाठी लष्कराची कितपत तयारी आहे ,याचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला.दिल्लीत झालेल्या आढावा बैठकीत लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री उपस्थित होते, याच बैठकीत पाकिस्तानवरील हल्ल्याची तारीख ठरल्याचे समजते.
पहेलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात सत्तावीस निरपराध पर्यटक मारले गेले. त्यामुळे भारतीय जनतेमध्ये पाकिस्तान विरुद्ध प्रचंड असंतोष आहे. पाकिस्तान मध्ये घुसून तात्काळ कारवाई करा अशी भावना लोकांनी रस्त्यावर उतरून व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तान बाबत निर्णय घेण्यासाठी दिल्लीत बैठकांची सत्र सुरू होते. आज यातील अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांकडून तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी लष्कराच्या तिन्ही दल प्रमुखांनी आपापल्या विभागाची कशा प्रकारे तयारी सुरू आहे, याची पंतप्रधान मोदींना माहिती दिली. या तयारी बाबत पंतप्रधान मोदी समाधानी असल्याचे समजते.त्यामुळे याच बैठकीत पाकिस्तानवर कधी आणि कसा हल्ला करायचा याची रणनीती ठरवण्यात आली असल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपासून नौदल,आणि हवाई दलाचा अरबी समुद्रात अभ्यास सुरू होता.यात विमानवाहू युद्धनिकेवरून राफेल, सुखोई, आणि इतर फायटर विमानांनी युद्ध अभ्यास केला. तसेच क्षेपणास्त्र ही डागली. त्यामुळे भारताची जबरदस्त तयारी असल्याचे दिसत आहे. याच तयारीचा आज पंतप्रधान मोदींनी आढावा घेतला. या आढाव्यानंतर ते समाधानी असल्याचे समजते. त्यामुळे आता युद्धाचा दिवस अगदी जवळ येऊन ठेपला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे नेते भारताविरुद्ध गरळ ओकत आहेत .यामध्ये पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांपासून पाकिस्तानच्या मीडियापर्यंत सर्वांचा समावेश आहे. प्रत्येक जण भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देत आहे. मात्र अशा धमक्यांना आम्ही अजिबात घाबरणार नाही. भारत ही जगातील चौथी मोठी लष्करी ताकद आहे. आणि आमच्याकडे भरपूर युद्ध सामग्री आहे. शिवाय १९४८ पासून तब्बल पाच वेळा आम्ही पाकिस्तानला धूळ चारली आहे. त्यामुळे आम्हाला कसलीही भीती नाही असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले आहे. पंतप्रधान बरोबर झालेल्या बैठकीनंतर युद्धाच्या तयारीला वेग येणार आहे. तर भारत कोणत्याही क्षणी आमच्यावर हल्ला करू शकतो असे पाकिस्तान संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तान मध्ये अक्षरशा घबराहट माजली आहे. पाकिस्तानातील अनेक नेत्यांनी आपल्या कुटुंबीयांना परदेशात पाठवले आहे. तर लष्कर प्रमुख मुनीर आणि त्याचे काही सहकारी बंकर मध्ये लपून बसले आहेत. पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे . त्यामुळे आता युद्ध अटळ आहे .
