[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिका

पालिकेचे सिटी ब्युटी फायर


मुंबई/सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई या पालिकेच्या घोषणेनंतर मुंबई किती सुंदर आणि किती स्वच्छ झाली हे त्या परमेश्वरालाच ठाऊक ! पण आता शहरातील क्लीन अप मार्शल ना मात्र एक नवी ओळख मिळणार आहे.कारण त्यांच्या जकेटवर यापुढे क्लीन अप मार्शल ऐवजी सिटी ब्युटी फायर असे लीहले जाणार आहे.आता ही नवी ओळख तरी सफाई कामगारांच्या पचनी पडते की नाही ते लवकरच दिसेल
२०१८ मध्ये सेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सिक्कीम येथील सफाई कामगारांच्या प्रमाणे मुंबईतील सफाई कामगारांना सिटी ब्युटी फायर असे संबोधले जावे असा प्रस्ताव दिला होता आणि विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यावेळी या प्रस्तावास अनुमोदन दिले होते त्यानंतर तब्बल तीन वर्षांनी हा प्रस्ताव मार्गी लावण्याबाबत निर्णय होणार असून सफाई कामगाराच्या जॅकेट वर आता क्लीन अप ऐवजी सिटी ब्युटी फायर असे दिसणार आहे

error: Content is protected !!