एकमेकांच्या संवादातून सहकाराचा रथ पुढे नेवूया- शालिनी सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष भानुदास महादेव जाधव यांचे प्रतिपादन
मुंबई/ सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शालिनी सहकारी बँकेची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सायन येथील वसंतदादा पाटील इंजिनियरिंग कॉलेजच्या सभागृहात पार पडली. यावेळ उपस्थितांना मार्गदर्शन करताना बँकेचे अध्यक्ष भानुदास महादेव जाधव यांनी सांगितले सहकारातील पैसा एकत्रितपणे आकारात आला तरच सहकार बळकट होईल. म्हणूनच एकमेकांच्या संवादातून सहकाराचा हा रथ पुढे नेवूया.यावेळी जाधव यांनी आर्थिक क्षेत्रातील सहकाराचे महत्वही विषद करून सांगितले. या सभेसाठी शालिनी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संगीता अर्जुन गायकवाड, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ अप्पासाहेब सदाशिव देसाई, बँकेचे कार्यकारी संचालक वरुण अप्पासाहेब देसाई, रमेश तुळशीराम भुतेकर, जनार्दन जळगावकर, श्रीरंग भानू सकपाळ,राहुल चंद्रकांत गायकवाड, रवींद्र शिवाजी काळे, प्रतिक गावकर, हनुमंत पवार, निरंजन कारेकर, प्रकाश कृष्ण, विष्णु शेलार, बँकेचे मुख्य व्यवस्थापक रमेश कोरडे तसेच कर्मचार मोठ्या संख्येने हजर होते.
सभेचे सूत्र संचालन अशोक गोळे यांनी केले तर आभार उपाध्यक्षा सौ संगीता गायकवाड यांनी मानले…!