[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीची फेर मत मोजणीची मागणी


दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक संचालक निवडणूक २०२५ – २०३० च्या मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता व अनागोंदी झाल्याचा गंभीर आरोप जय सहकार पॅनलचे विष्णू घुमरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी दिपक मदने, कविता विशे, वर्षा माळी, मुंजा गिरी आदी उमेदवार उपस्थित होते. जय सहकार पॅनलचे विष्णू घुमरे यांनी सांगितले की, मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव दिसून आला असून काही ठिकाणी मत चोरी सारखे प्रकार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

सदर बॅलेट पेपर अद्याप बँकेच्या कस्टडीत असल्याने, फेर मत मोजणीची मागणी जोर धरत आहे. उमेदवार दिपक मदने व महिला उमेदवार कविता विशे यांचे म्हणणे आहे की, पारदर्शकता राखण्यासाठी व मतदारांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाचे निरीक्षक यांच्या देखरेखेखाली पुन्हा एकदा मतमोजणी करण्यात यावी. “मतमोजणीत घडलेल्या प्रकारामुळे लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा गंभीर त्रुटींना विरोध करून पारदर्शक निवडणूक होण्यासाठी आम्ही सर्व पॅनेल एकत्र आलो आहोत,” असे जय सहकार पॅनलसह इतर उमेदवारांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून,
       आशिया खंडातील सर्वात मोठी पगारदार कर्मचाऱ्यांची बँक म्हणून दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेची ओळख आहे. या पंचवार्षिक निवडणुकीत हजारो कर्मचाऱ्यांचे मतदान झाले. तथापि, मतमोजणीदरम्यान टेबल क्रमांक ५८ वरील कर्मचाऱ्यांकडून मतांमध्ये हेराफेरी होत असल्याचे उघड झाल्याचा दावा काही उमेदवारांनी केला आहे. यासंदर्भात उपलब्ध असलेली व्हिडिओ क्लिप व पुरावे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच राज्यपाल, मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्याकडे सादर करण्यात आल्याची माहिती घुमरे यांनी दिली.

error: Content is protected !!