सलमान खानच्या हातावर भगवे घड्याळ आत राम मंदिराची चित्र मौलाना संतप्त
मुंबई/सलमान खान ईद च्या मुहूर्तावर त्याचे चित्रपट प्रदर्शित करतो आताही त्याचा सिकंदर हा आगामी चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रसिद्ध होणार आहे सलमान गेल्या काही दिवसांपासून त्याचे प्रमोशन करीत आहे मात्र या चित्रपटात त्याच्या हातावर भगवे घड्याळ असून त्यात राम मंदिर आणि हनुमान गडी चे चित्र आहे त्यामुळे मुस्लिम मौलाना संतप्त झाले आहेत त्यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
सलमान खान यांच्या हातात असलेले हे घड्याळ जेकब अँड कंपनीने बनवले असून त्याची ३४ लाख रुपये किंमत आहे मात्र ते लिमिटेड एडिशन आहे असे बोलले जाते तरीसुद्धा सलमान खानला कट्टर पंथीयनी ट्रॉल करायला सुरुवात केली आहे त्यामुळे आगामी काळात सिकंदर हा चित्रपट प्रदर्शनाच्या निमित्ताने वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे वास्तविक पाहता सलमान खान याचे कुटुंबीय जाती धर्मापासून दूर राहतात सलमानचे वडील सलीम खान हे पुरोगामी विचारवंत म्हणून ओळखले जातात सलमान ही फारसा जातीयवादी असल्याचे आतापर्यंत त्याच्या बोलण्यातून आणि वागण्यातून दिसून आले नाही परंतु तरीही तो काही जातीयवाद्यांच्या रडारवर आहे खास करून बिश्नोई समाजाच्या रडावर आहे आणि आता तर राम मंदिराचे चिन्ह असलेले भगव्या घड्याळ सिकंदरच्या निमित्ताने हातात घातल्यामुळे तो आणखी वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहे ऑल इंडिया जमाती इस्लामचे अध्यक्ष मौलाना रिजवी यांनी शरीयत चा हवाला देत सलमानच्या या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे इतरही लोक सलमानला विरोध करण्याची शक्यता आहे
