[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

ढोल ताशांच्या गजरात चिंतामणीचे आगमन

मुंबई/ गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला आहे त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बाप्पांची मूर्ती वाजत गाजत आपल्या मंडपात नेत आहेत . शनिवारी चिंचपोकलीचा चिंतामणीचे असेच ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आगमन झाले . यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते रेश्मा खातू यांच्या गणेश मूर्ती चित्र शाळेपासून चिंचपोकळी येथील चिंतामणीचे मंडपापर्यंत परिसर गणेशमय झाला होता . करोना गेल्यावर सर्व सणांच्या वरील निर्बंध हटवल्यानंतर प्रथमच मोठ्या उत्साहात यंदा गणेशोत्सव साजरा होतोय . त्यामुळे मुंबईतील गणेशभक्तांच्या उत्साहाला पारावर उरलेला नाही चिंतामणीचे आगमन सोहळ्यातील हेच दिसत होते .

error: Content is protected !!