[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

मुंबईत 269 शाळा अनधिकृत नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी


मुंबई/ मुंबईत तब्बल 269 शाळा अनधिकृत असून या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे या प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान हा अत्यंत गंभीर प्रश्न असून जर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे .त्यांनी पुढे म्हटले आहे या शाळा बेकायदेशीर असतील तर या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता धोक्यात येऊ शकते पालिकेकडून या शाळांना नोटीस बजावली जाते . पण राज्य सरकारकडून कारवाई का केली जात नाही असा सवाल करून बेकायदेशीर शाळांचे हे रॅकेट असल्याचा आरोप त्यांनी काल आहे

error: Content is protected !!