भारतीय हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानात पळापळ सुरू – लष्कर प्रमुख असीम मुनीरसह मंत्री आणि नेतेही बंकर मध्ये लपले
इस्लामाबाद – पहेलगाम हल्ल्याला जबाबदार असणारा पाकिस्तानी लष्कर प्रमुख असे असीम मुनीर याच्याविरुद्ध पाकिस्तान मधील जनतेनेच विद्रोह केला असून, एकीकडे पाकिस्तानी जनतेची भीती, तर दुसरीकडे भारतीय हल्ल्याचा धोका, यामुळे घाबरलेलाआसिफ मुनीर आता बंकर मध्ये लपला असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांचा बळी गेला होता. त्यानंतर संपूर्ण जगभर पाकिस्तान विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. जगातील सर्व देशांनी पाकिस्तानची मदत बंद केली आहे. त्यातच भारताने सिंधू जल करार रद्द करून पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळवले आहे. या सगळ्याला लष्कर प्रमुख असीम मुनीर जबाबदार असल्याची भावना पाकिस्तानी जनतेमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानी जनता असीम मुनीरच्या विरुद्ध रस्त्यावर उतरली आहे. ठीक ठिकाणी आसिफ मुनीर विरुद्ध आंदोलने केली जात आहे. आसिफ मुनीरला ताबडतोब लष्कर प्रमुख पदावरून हटवा अशी मागणी केली जात आहे. जनतेच्या या विद्रोहामुळे मुनीर आणि त्याचे वरिष्ठ लष्करी सहकारी इतके घाबरले आहेत की, बंकर मध्ये लपण्याची त्यांच्यावर पाळी आली आहे. मुनिरं याने आपल्या कुटुंबाला यापूर्वीच परदेशात पाठवले आहे .भारताकडून कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानी लष्कर प्रमुख आणि त्याच्या सैन्याला वाटत असल्यामुळे ,यापूर्वीच मुनीर ने आपल्या सैन्याला बंकर मध्ये लपण्याचे आदेश दिले होते. तसेच मुनीर स्वतःही बंकर मध्ये लपलेला आहे. भारतीय लष्करी हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानने सीमेवर अतिरिक्त लष्कर आणून उभे केले आहे. तसेच आपल्या वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांची चाचणी सुरू केली आहे. खास करून कराची बंदर आणि समुद्रालगतची पाकिस्तानची सीमा यावर पाकिस्तानी नेव्ही आणि हवाई दलाचे विशेष लक्ष आहे. कारण अरबी समुद्रात भारतीय नौदलाने अभ्यास सुरू केल्याने, भारतीय नौदल कधीही कराची वर येऊन धडकेल. अशी भीती पाकिस्तानला वाटते .त्यामुळेच भारताला लागून असलेल्या समुद्री सीमांच्या संरक्षणावर पाकिस्तान अधिक लक्ष देत आहे. तर दुसरीकडे भारताने टार्गेट आणि हल्ल्याची तारीख निश्चित केली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यासाठी दिल्लीत बैठकांवर बैठका होत आहेत. भारताचे सीडीएस आणि गृहमंत्री तसेच राष्ट्रीय सल्लागार अजित ढोबल यांचीही एक बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. त्यातच रविवारी मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पहलगाम मधील पिढीताना जरूर न्याय मिळेल. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना सोडणार नाही. असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात पाकिस्तानवर मोठा सर्जिकल स्ट्राइक होण्याची शक्यता आहे.
