ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

रामदास कदम यांच्या या मागणी नंतर पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन गटात मोठा वाद

मुंबई/दिशा सालियन या मृत्यू प्रकरणात न्यायालयात गेलेल्या दिशाच्या वडिलांची नार्को टेस्ट करण्याची मागणी होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांचीही नारकोटेस्ट करा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे रामदास कदम यांनी म्हटले आहे की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या सर्व नेत्यांना संपवण्याचे कटकारस्थान उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याची शिक्षा त्यांना लवकरच भोगावे लागणार आहे त्याचबरोबर दिशा आणि मृत्यू प्रकरणात आपल्या मुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही उद्धव ठाकरे यांनी केला असाही आरोप रामदास कदम यांनी केला आहे तसेच या प्रकरणी आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट व्हायला हवी तरच या प्रकरणातील खरे रहस्य उघडकीस येईल असेही रामदास कदम यांनी म्हटलेले आहे रामदास कदम यांच्या या मागणीनंतर पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन गटात मोठा वाद उफाळून येणार आहे

error: Content is protected !!