[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

हिंदूंनी घरात हत्यारे बाळगावीत – साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर


हुबळी – लव्ह जिहाद सारख्या प्रकरण जशास तसे उत्तर द्यायचे असेल तर हिंदूंनी घरात हत्यारे बाळगावीत असा वादग्रस्त सल्ला भाजपच्या खासदार आणि मालेगाव बॉम्ब स्फोटाच्या प्रमुख आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी दिला आहे.

कर्नाटकातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले कि हिंदूंनी घरामध्ये शस्त्रं बाळगली पाहिजेत किंवा धारदार सुऱ्या तरी सोबत बाळगल्या पाहिजेत असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे. कर्नाटकात हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येविषयी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. लव्ह जिहाद करणाऱ्यांना लव्ह जिहादसारखंच उत्तर दिलं पाहिजे. आपल्या घरात हिंदूंनी शस्त्र बाळगलीच पाहिजेत असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे.
लव्ह जिहाद करणाऱ्यांना लव्ह जिहादसारखंच उत्तर दिलं पाहिजे. आपल्या मुलींवर संस्कार घडवा. आपल्या मुलींना गोष्टी समजावून सांगा. एवढंच नाही तर हिंदूंनी आपल्या घरांमध्ये हत्यारं बाळगली पाहिजेत. काहीही नसेल तर भाजी कापण्याच्या सुरीला धार लावून घ्या. स्पष्टच सांगते आहे की आपल्या घरातले चाकू, सुरे जे आपण भाजी कापायला वापरतो ते धारदार असले पाहिजेत. त्यांनी चाकू भोसकून आपल्या हर्षावर हल्ला केला. त्यांनी चाकू सुऱ्यांनी भोसकून बजरंग दल, भाजपा, भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा जीव घेतला आहे. आता शस्त्रांना धार करण्याची वेळ आपली आहे. माहित नाही कधी आवश्यकता भासेल. जर आपल्या घरातली भाजी व्यवस्थित कापली गेली तर आपल्या शत्रूची जीभ आणि त्याचं शीरही आपल्याला प्रसंगी कापता येईल.

error: Content is protected !!