[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

त्याचा जात धर्म काढला… तरीही तो डगमगला नाही, कर्तव्य बजावत राहीला…

मुंबई : “तुम्ही…त्याला धमक्या दिल्या, त्याला अपमानीत केलं, त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या, त्याच्या बहिणीवर आरोप केले, त्याच्या आई-वडीलाना बदनाम केलं, त्याचा जात धर्म काढला… तरीही तो डगमगला नाही, कर्तव्य बजावत राहीला… असं ट्वीट करुन भाजपच्या उपाध्याक्षा चित्रा वाघ यांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोपींवर नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. बॉलिवूडमधील लोकांकडून खंडणी वसुली, लाचखोरी आणि बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोपाचा त्यात समावेश आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांना स्वत: समीर वानखेडे, त्यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि बहीण यास्मिन वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे.

error: Content is protected !!