[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महापालिका

खड्ड्यांबाबत ठाणे पालिकेच्या अधिकार्‍यांना निलंबित केले मग मुंबईतल्या अधिकार्‍यांना कोण वाचवतोय ?

ठाणे – रस्त्यावरील खड्डे हे पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांचे पाप आहे पण यावेळी लोकांनी आवाज उठवतच अनेकांचे बळी घेणार्‍या भिवंडी पढघा रस्त्यावरच्या खड्ड्यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना पाहणी करावी लागली आणि या प्रकरणी ठाणे पालिका प्रशाशनातील 4 अभियंताना निलंबित करण्यात आले तर ठेकेदाराणाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत . ठाण्यात जशी कारवाई झाली तशी मुंबईत का नाही असा सवाल मुंबईकर विचारीत आहेत ? मुंबईच्या रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे आणि ते खड्डे भरण्यासाठी पालिकेला पुन्हा पुन्हा खर्च करावा लागतोय यात पालिका अधिकारी आणि ठेकेदारांची चांदी होतेय .सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी कधी तरी मुंबईच्या रस्त्यांकडेही पाहावे कारण रस्त्याचे निकृष्ट काम करून मुंबई महापालिकेला चुना लावणारे पालिका अधिकारी आणि कंत्राटदार हे काही सरकारचे जावई नाहीत मग त्यांना कशासाठी सरकार अभय देते .एकदा त्यांचीहि चौकशी सरकारने सुरू करावी आणी .त्यांच्यावरी कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर करीत आहेत .

error: Content is protected !!