जम्मू काश्मीर पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध उल्हासनगर मध्ये सर्वपक्षीय आंदोलन
उल्हासनगर : जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटंकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात बऱ्याच निष्पाप जिवांचा बळी गेल्याने देशात संतापाची उसळली असुन जागो जागी निषेध आंदोलने सुरु आहेत. उल्हासनगर मध्ये सुध्दा सर्व पक्षीय नेत्यानी एकत्र येवुन शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करुन आतंकवाद व पाकिस्तान चा निषेध केला आहे .
जम्मु काश्मिर येथे परवा विविध राज्यातुन पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटंकांवर आतंकवाद्यानी बेछुट गोळीबार करुन निष्पाप जीवांचा बळी घेतला आहे. या हल्ल्यात पाकीस्तान चा हात असल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे. उल्हासनगर शहरात सर्व पक्षीय नेत्यानी एकवटुन या घटनेचा निषेध केला आहे. आज कॅंप ३ येथील शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिंदे गट सोडुन उल्हासनगर शहरांमध्ये सर्वपक्षीय निषेध आंदोलन करून पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत उल्हासनगर तीन येथील शिवाजी महाराज चौक येथे निषेध करण्यात आला . या आंदोलनात भाजपाचे आमदार कुमार आयलानी ,जमनू पुरस्वानी , शिवसेनेचे ( उबाठा ) कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे , पी आर पी चे जिल्हा अध्यक्ष प्रमोद टाले , कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष रोहित साळवे , मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन कदम , शहर अध्यक्ष बंडु देशमुख , संजय घुगे, मनसे युनियन चे अध्यक्ष व जिल्हा संघटक दिलीप थोरात , मैनूद्दीन शेख , आर पी आय( आठवले ) चे शहर महासचिव पंडीत निकम, कमलाकर सुर्यवंशी , राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवाजी रगडे, दिलीप मिश्रा , राधाचरण करोतिया , कैलास तेजी हे सहभागी झाले होते. यांनी काळ्या फिती डोक्याला बांधुन निषेध केला आहे.
