सिंधू नदीत पाणी नव्हे तर रक्ताचे पाट वाहतील पाकिस्तानचा भारताला इशारा
इस्लामाबाद/पुलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या या निर्णयाविरुद्ध सध्या पाकिस्तान मध्ये थयथयाट सुरू असून, पाकिस्तानचे एक मंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताला जाहीरपणे धमकी दिली आहे, की आमचे पाणी जर भारताने बंद केले तर सिंधू नदीत पाणी नव्हे तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील.बिलावलच्या या विधानामुळे भारतात संतापाची लाट उसळली आहे.
पेहेलगाव हल्ल्यात २७ निरपराध पर्यटक मारले गेल्यानंतर ,भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर पावले उचलली होती. भारताने तीन मोठे निर्णय सुरुवातीला घेतले होते. यामध्ये सिंधू जलकरार रद्द, आडाíरी बॉर्डर बंद ,आणि भारतातील पाकिस्तानी नागरिकांचा विजा तात्काळ रद्द. अशा प्रकारचे निर्णय घेतले होते. त्यामुळे पाकिस्तानात खळबळ माजली होती. खास करून सिंधू जल करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानात हाहाकार उडाला होता. त्यामुळे चिडलेले पाकिस्तानी नेते आता वादग्रस्त विधान करायला लागले आहे. लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हापीज सईद यांनी एका जाहीर सभेत सांगितले की, मोदी अगर तुमने हमारा पाणी बंद किया तो हम तुम्हारे सास बंद कर देंगे! तर शहानवाज मंत्रिमंडळातील एक मंत्री बिलावल भुत्तो त्याने म्हटले आहे की, सिंधू जल करार रद्द झाल्यास, सिंधू नदीत यापुढे पाणी नव्हे तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील. खुद्द पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनीही भारताच्या या निर्णयाबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत पाणी बंद करणे म्हणजे युद्धाची परिस्थिती निर्माण करणे असे होईल. पाकिस्तानी नेत्यांच्या या वादग्रस्त विधानांमुळे, आता भारत पाकिस्तान वर आक्रमक लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
