[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक


सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. कालपासून पीएसआय बदने पोलिसांना गुंगारा देत होते. ते पोलिसांना सापडत नव्हते. गोपाळ बदने यांचा शोध फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत होते. सातारा पोलिसांच्या माध्यमातून पंढरपूर आणि पुणे येथे पाठवण्यात आली होती. मात्र, स्वत: गोपाळ बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर लिहिलेल्या नोटवर पीएसआय गोपाळ बदने यानं चारवेळा बलात्कार केल्याचं लिहिलं होतं. यामुळं मोठी खळबळ उडाली होती….
पीएसआय गोपाळ बदने याच्या नावाचा उल्लेख फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर महिलेनं आत्महत्या केल्यानंतर तिच्या हातावरील नोटमध्ये होता. डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर पीएसआय गोपाळ बदने याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. डॉक्टर महिलेच्या आत्महत्येची माहिती समोर येताच पीएसआय गोपाळ बदने फरार झाला होता. त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर आढळल्यानं पोलिसांची पथकं पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली होती. तर, सातारा पोलिसांची पथकं पुणे जिल्ह्यात देखील रवाना झाली होती. डॉक्टर महिलेच्या हातावर पीएसआय गोपाळ बदने याच्यासह प्रशांत बनकर याचं नाव देखील होती. प्रशांत बनकर यानं चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं नोटमध्ये म्हटलं होतं. प्रशांत बनकर देखील ही घटना समोर आल्यानंतर फरार झाला होता. प्रशांत बनकर याला फलटण पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर प्रशांत बनकर याला फलटण येथील न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाकडून प्रशांत बनकर याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

error: Content is protected !!