[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारी यांच्या कन्येच्या ताफ्यावर हल्ला

कराची/सिंधू नदी मे हिंदुस्थानियों के खून की नदिया बहेगी असे उन्मत्त विधान करणारा पाकिस्तानचा मंत्री बिलावल भुत्तो याची बहिण असिफा हिच्या ताफ्यावर आंदोलकांनी हल्ला केला सुदैवाने ती या हल्ल्यातून बचावली असिफा ही राष्ट्रपती झरदारी व माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची कन्या आहे. जर राष्ट्रपतीच्या कन्येच्या ताफ्यावर हल्ला होऊ शकतो तर इतरांचे काय? असा सवाल करी पाकिस्तानी जनतेने देशातील सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफा कराचीहून नवाबशाहला जात होत्या. दरम्यान, आंदोलकांनी त्यांचा ताफा थांबवला आणि वादग्रस्त कालवा प्रकल्प आणि कॉर्पोरेट शेतीविरुद्ध घोषणाबाजी केली. काही लोकांनी ताफ्याच्या वाहनांवर हात आणि काठ्यांनी हल्ला केला.

असिफासोबत असलेल्या सुरक्षा पथकाने आणि हैदराबाद पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि त्यांची गाडी तिथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाकिस्तान सरकार सिंध नदीवर कालवा बांधण्याची योजना आखत आहे. स्थानिक लोक यामुळे संतप्त आहेत. मंगळवारी संतप्त लोकांनी सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लंजर यांचे घर जाळले होते.भागातील एसएसपी जफर सिद्दीकी यांनी माध्यमांना सांगितले की, ताफा एका मिनिटापेक्षा कमी वेळ थांबला आणि आसिफा किंवा त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाली नाही.
ते म्हणाले – शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या निदर्शकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे. अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल..

error: Content is protected !!